दक्षिण कोकणची काशी अशी संपूर्ण कोकणासह राज्यात ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिर. हे पांडवकालीन कुणकेश्वर मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील समुद्र किनारी वसलेलं आहे. कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने यात्रा उत्सवाला सुरवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते. आठ ते दहा लाख भक्तांची मांदियाळी याठिकाणी पाहायला मिळते. काशी येथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्वर येथे 107 शिवलिंगे आहेत. मात्र हि शिवलिंगे समुदाच्या काठावर असल्यामुळे ही ओहोटीच्या वेळीच पाहायला मिळतात. या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगांमुळेच या स्थानाला कोकणची काशी असे संबोधले जाते.