साऊथची लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या गोव्यात सुट्टी एन्जॉय करत आहे. पती गौतम किचलूसोबत तिचा गोंडस मुलगा नीलही तिला कंपनी देत आहे. नीलची ही पहिली सुट्टीची सहल आहे. काजलने तिचा मुलगा नीलचा एक क्यूट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नीलचे छोटे पाय वाळूत दिसत आहेत. तो समुद्रकिनाऱ्यावर मजा करत आहे. काजलच्या मुलाच्या फोटोला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. छोट्या नीलवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. फोटो शेअर करताना काजलने लिहिले आहे की, नीलची ही पहिलीच सुट्टी आहे. यासोबतच नीलला 'बीच बेबी' असे म्हटले आहे. काजल गोव्यात खूपच एन्जॉय करत असल्याचे या फोटोंमधून दिसत आहे. चाहत्यांनी देखील काजलचे हे फोटो शेअर केले आहेत.