उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'वो तेरे प्यार का गम' असे या गाण्याचे नाव आहे. अमृता फडणवीस यांचे 'वो तेरे प्यार का गम' हे नवं गाणं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. अल्पावधितच या गाण्याला 2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 'माय लव्ह' या हिंदी सिनेमातील 'वो तेरे प्यार का गम' हे गाणं आहे. आता या गाण्याचे रिक्रिएट वर्जन अमृता फडणवीस यांनी गायले आहे. 'सारेगम' या युट्यूब चॅनलवर 'वो तेरे प्यार का गम' हे गाणं लॉंच करण्यात आलं आहे. 'वो तेरे प्यार का गम' हे गाणं त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.