रवीना टंडन म्हणजे बॉलीवुडमधील एकेकाळीची आघाडीची अभिनेत्री सध्या रवीना सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते. ती कायम नवनवीन फोटोज पोस्ट करत असते. आताही तिने एक सुंदर असं ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. एका सुंदर अशा गाऊनमध्ये तिने काही फोटोज काढले आहेत. हे सर्व फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. रवीनाने 90च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते. रवीना 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही. तिच्या सर्वच फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सा पाऊस पडतो. रवीना सर्वच लूकमध्ये ग्लॅमरस दिसते.