जामखेड तालुक्यातील खर्डा परिसर ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. सध्या खर्ड्यातील ज्वारीचे पीक हुरड्यात आले आहे. यावर्षी मात्र खराब हवामानामुळे ज्वारी पिकावर मोठ्या प्रमाणात चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे... चिटका आणि मावा याचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे शेतकरी सांगतात... तर दुसरीकडे रानडुकरांचाही उपद्रव वाढल्याने पिकाचे मोठे नुकसान होत असून शेतकरी हैराण झालेत... मागील आठवड्यात सुटलेल्या वाऱ्यामुळे ज्वारी खाली पडली आहे... त्यामुळे रानडुक्कर आणि उंदरांनी पिकांचे मोठे नुकसान केल्याचे शेतकरी सांगतात... त्यातच ढगाळ हवामानामुळे वातावरणात गारठा निर्माण झाल्याने ज्वारीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे... यामुळे उत्पादनात घट आणि चाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कडब्याचेही नुकसान झाले आहे... मात्र, शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे तालुका कृषी अधिकारी राजू सुपेकर यांनी म्हटलंय... रानडुक्करांमुळं शेतीचे नुकसान झाले तर वनविभाग किंवा कृषी विभागाशी संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलंय.