जगभरात एकीकडे कोरोना विषाणूचा धोका कमी होत नाहीय, त्यातच आता आणखी एक धोकादायक विषाणू आढळला आहे.



धक्कादायक म्हणजे हा विषाणू मानवी मेंदूच्या पेशींवर हल्ला करून त्या नष्ट करतो, म्हणूनच या विषाणूला 'ब्रेन इटिंग अमिबा' (Brain Eating Amoeba) असेही म्हणतात.



दक्षिण कोरियामध्ये 29 डिसेंबर रोजी मृत्यू झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीमध्ये हा आजार आढळून आला आहे.



ही व्यक्ती नुकतीच थायलंडहून दक्षिण कोरियाला परतली होती.



थायलंडहून परतल्यानंतर त्यांना डोकेदुखी, ताप, उलट्या, बोलण्यात अडचण आणि मान ताठ अशी लक्षणे दिसू लागली.



यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.



नेग्लेरिया फॉलेरी नावाच्या अमिबामुळे हा आजार पसरतो. याला 'ब्रेन इटिंग अमिबा' (Brain Eating Amoeba) असेही म्हणतात.



हा अमिबा हळूहळू मेंदूच्या पेशी नष्ट करून मेंदू पोकळ करतो.



अमेरिकन रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या मते, नेग्लेरिया फॉलेरी हा एक अमिबा आहे. हा अमिबा नद्या, तलाव, झरे सारख्या पाणवठ्यांमध्ये आढळतो.



नेग्लेरिया फॉलेरी अमिबा नाकावाटे मेंदूपर्यंत पोहोचते. त्यानंतर त्याचा मेंदूवर परिणाम होऊ लागतो.



प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस म्हणून ओळखला जाणारा हा रोग मेंदूच्या पेशींचा नाश करतो.



PAM आजाराची लागण झाल्यावर पहिली लक्षणे साधारणतः पाच दिवसांनी दिसू लागतात.



काही प्रकरणांमध्ये एक ते 12 दिवसांमध्ये लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या ही याची सुरुवातीची लक्षणे आहेत.



यावर अद्याप प्रभावी उपचार उपलब्ध नसून त्यावर संशोधन सुरु आहे.



सध्या या आजारावर उपचार म्हणून अँटीबायोटिक्स, अँटीफंगल्स आणि अँटी-पॅरासिटिक यांचे मिश्रण असलेल्या औषधांद्वारे उपचार केले जात आहेत.