सजसे वय वाढते तसतसे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते, याचा परिणाम आरोग्यावर दिसू लागतो. त्यामुळे अशाच काही टिप्स शेअर जाणून घ्या ज्याचा तुमच्या शरीरासाठी फायदा होईल.



प्रत्येक पुरुषाला वयाच्या 50 व्या वर्षीही तंदुरुस्त राहायची इच्छा असते. पुरुषही यासाठी खूप मेहनत घेतात, पण अनेक जण वयाच्या आधीच म्हातारे दिसू लागतात.



जर तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षीही तरुण आणि तंदुरुस्त दिसायचे असेल तर तुम्ही काही सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता.



दिवसभरात किमान अर्धा किंवा एक तास व्यायम करणे फार आवश्यक आहे. तुम्ही योगासने, चालणे किंवा पायऱ्या चढणे आणि उतरणे अशा सोप्या व्यायामाच्या सवयींचा अवलंब करु शकता.



वजन नियंत्रित ठेवा - जास्त वजनामुळे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, श्वासोच्छवासाचा त्रास अशा अनेक समस्या सुरू होतात.



निरोगी आरोग्यासाठी तुम्ही चांगला आहार घेणे महत्त्वाचे आहे. आहारामध्ये आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. प्रोसेस्डचे सेवन टाळा.



जेवणात साखर, मीठ, मसाले आणि तेलाचे प्रमाण जितके कमी ठेवाल तितके चांगले.



बाहेरचे अन्न खाणे टाळा. जेवणाच्या वेळा ठरवा. रात्रीचे जेवण पचनासाठी खूप हलके असावे.



पुरेशी झोप घेतल्याने तुमचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हा सोपा पण प्रभावी उपाय आहे.



दररोज सुमारे 7 ते 8 तास झोपं घेणं आवश्यक आहे



तंदुरुस्त आणि तरुण राहण्यासाठी तुम्ही नेहमी आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. तणावमुक्त राहिल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते.



शरीर तरूण आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे. पुरुषांनी दररोज किमान आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.