2023 मध्ये रोज योगा करण्याचा संकल्प करा योगामुळे तुमचे मन शांत होते आणि तुमचा मूड फ्रेश होतो. तसेच योगासने केल्याने तुम्ही अनेक आजारांपासून वाचाल.



आजकाल लोक त्यांच्या आयुष्यात इतके व्यस्त झाले आहेत की ते छंद, आवड यांच्याकडे लक्ष देत नाहीत. या वर्षी तुम्ही बागकाम, पेंटिंग आणि स्केचिंग यासारख्या गोष्टी शिकू शकता. तसेच छंद जोपासू शकता.



तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी आहार आणि व्यायाम आवश्यक आहे. अशा परिस्थितीत वर्षातून एकदा तरी संपूर्ण शरीराची तपासणी करणे आवश्यक आहे.



कधीकधी तणावामुळे भूक देखील लागत नाही. अशा परिस्थितीत या नवीन वर्षात स्वतःला वचन द्या की या नवीन वर्षातही तुम्ही कोणताही ताण घेणार नाही.



आपल्या आहारात फायबर, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक घटकांचा समावेश करून आणि नियमित व्यायाम करून वजन कमी करणे हा संकल्प देखील तुम्ही करु शकता.



हेल्दी आहाराचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. अधिकाधिक फळे आणि भाज्या खा कारण त्यातून तुम्हाला पुरेशा प्रमाणात फायबर आणि प्रथिने मिळतील.



आजच्या काळात गॅजेट्सपासून दूर राहणे कठीण झाले आहे.



. गॅजेट्स इतके महत्त्वाचे भाग बनले आहेत की आपण त्यांच्याशिवाय एक सेकंदही राहू शकत नाही.



नवीन वर्षात असा संकल्प करा की या वर्षी तुमचा जास्त वेळ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरण्यात जाणार नाही.



नव्या वर्षात तुम्ही मोबईल कमी वेळ वापरण्याचा संकल्प करु शकता.