बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या 'अटॅक' सिनेमाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या सिनेमाचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'अटॅक' सिनेमाचा ट्रेलर 7 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर सिनेमा 1 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहमसोबत रकुल प्रीत सिंह आणि जॅकलिन फर्नांडिसदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 1 एप्रिलला 'अटॅक' सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. 'अटॅक' सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये जॉन अब्राहम अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. 'अटॅक' सिनेमाचा निर्मातादेखील जॉन अब्राहम आहे.