रणवीर सिंहचा '83' सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. 20 मार्चला रविवारी रात्री आठ वाजता स्टार गोल्डवर '83' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. चांगली कथा, उत्तम कलाकार असूनदेखील हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. कोरोनाचा '83' च्या कमाईवर मोठा परिणाम झाला. प्रेक्षक आता '83' सिनेमा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. '83' सिनेमाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे. सिनेमात रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे.