अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आपले सर्व अधिकार उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन कॉलोनोस्कोपीसाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत.
त्यामुळे आपल्या पदाचे अधिकार काही काळासाठी ते उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवणार आहेत.
व्हाइट हाऊसच्या वतीनं यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
व्हाइट हाउसकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, जो बायडन शुक्रवारी आपले सर्व अधिकार काही दिवसांसाठी कमला हॅरिस यांच्याकडे सुपूर्द करतील.
ते पुढे म्हणाले की, बायडन प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल होणार आहेत.
त्यांची कॉलोनोस्कोपी करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना अॅनेस्थिसिया देण्यात येणार आहे.
अनेस्थिसियाच्या प्रभावातून बाहेर येण्यास त्यांना काही काळ लागेल. त्यामुळे ते पूर्णपणे अनेस्थिसियाच्या प्रभावातून बाहेर येईपर्यंत राष्ट्राध्यक्ष पदाच्या सर्व जबाबदाऱ्या कमला हॅरिस सांभाळणार आहेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्यात काही वाद झाल्याचं समोर आलं होतं.
कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष; जो बायडन आपले सर्व अधिकार सोपवणार