'मिर्झापूर' फेम अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे निधन झाले आहे. जितेंद्र यांनी अनेक सिनेमांसह अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या 'मिर्झापूर' (Mirzapur) या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे. जितेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टी हादरली आहे. जितेंद्र शास्त्री यांनी 15 ऑक्टोबरला जगाचा निरोप घेतला आहे. जितेंद्र टीवीएफच्या 'ट्रिललिंग' या वेबसीरिजमध्ये शेवटचे दिसले होते. जितेंद्र शास्त्री यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. जितेंद्र शास्त्री यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत काम केलं आहे. 'मिर्झापूर' या वेबसीरिजमुळे जितेंद्र यांच्या लोकप्रियतेत भर पडली. सिनेमांसह जितेंद्र शास्त्री यांनी नाटकांतदेखील काम केलं आहे. मनोज बाजपेयीनेदेखील ट्वीट करत जितेंद्र शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिली आहे.