अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं करवा चौथ हा सण साजरा केला. तिनं पती राज कुंद्रासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्री कतरिना कैफनं तिचा पहिला करवा चौथ हा सण साजरा केला. कतरिनानं पती विकी कौशलसोबतचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पहला करवा चौथ' गायिका नेहा कक्करनं देखील करवा चौथ हा सण साजरा केला. अभिनेत्री मौनी रॉयचा पहिला करवा चौथ सण साजरा केला. मौनीनं पती सुरजसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मौनी खास लूकमध्ये दिसत आहे. अभिनेता आर. माधवन यानं पत्नीसोबतचा फोटो शेअर करुन सर्वांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी करवा चौथ सण साजरा केला असून त्यांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नताशा दलालनं पती वरुण धवनसोबत करवा चौथ सण साजरा केला. वरुणनं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा आणि नताशाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे, अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता यांनी देखील करवा चौथ साजरा केला. गायक राहुल वैद्यनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये राहुल आणि दिशा यांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.