अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडिया सेन्सेशनपेक्षा कमी नाही. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. दिशाने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये लवेंडर कलरच्या स्वेटरमध्ये दिशा पटानीचा क्यूट अंदाज दिसत आहे. काही मिनिटांतच दिशाच्या या नव्या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. दिशा नेहमीच तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. दिशा पटानी चित्रपटांपेक्षा तिचा फिटनेस आणि स्टाईलमुळे जास्त चर्चेत असते. दिशा पटानीच्या स्टाईल आणि फिटनेसने लोकांना भुरळ घातली आहे. तिच्या फोटोशूट, फिल्म्स आणि वर्कआउट्सच्या झलक तिच्या इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात. दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. आता लवकरच ही अभिनेत्री 'वॉरियर', 'क्टिना' आणि 'प्रोजेक्ट के' सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.