अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. जवान चित्रपटात शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा आहे. जवान चित्रपटात एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शाहरुखच्या आईच्या भूमिकेत झळकली आहे. शाहरुख खानपेक्षा वयाने 19 वर्षांनी लहान असूनही जवान चित्रपटात ती शाहरुखच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोग्रा हिने जवान चित्रपटात शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारली आहे. रिद्धी डोग्राला या भूमिकेत पाहून त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ट्रेलरमध्ये रिद्धी वृद्ध महिलेच्या भूमिकेत दिसली होती. रिद्धी डोग्रा हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने अनेक हिट टीव्ही मालिका आणि लोकप्रिय वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. रिद्धी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. रिद्धी डोग्राने अभिनेता राकेश बापटसोबत लग्न केलं होतं. दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. पण, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अभिनेत्री रिद्धी डोग्रा आणि अभिनेता राकेश बापट 2019 मध्ये एकमेकांपासून विभक्त झाले.