मानुषी छिल्लर ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. मनुषी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड-2017 चा खिताब पटकावला होता. मानुषीनं फेमिना मिस इंडिया 2017 ही स्पर्धा देखील जिंकली होती. मानुषी ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सम्राट पृथ्वीराज या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सम्राट पृथ्वीराज या चित्रपटात मानुषीनं संयोगिता ही भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये मानुषीनं अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर केली होती. आता मानुषी ही द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. द ग्रेट इंडियन फॅमिली या आगामी चित्रपटात मानुषी ही अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) स्क्रिन शेअर करणार आहे. मानुषीचा द ग्रेट इंडियन फॅमिली हा चित्रपट 22 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. मानुषी नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. एअरपोर्टवरील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मानुषी ही पिंक कलरचा आऊटफिट, व्हाईट बॅग, व्हाईट शूज आणि मोकळे केस अशा लूकमध्ये स्पॉट झाली.