सोमवारी विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील एका कार्यक्रमात विजय देवरकोंडानं हजेरी लावली.



विशाखापट्टणम येथील कार्यक्रमामधील कार्यक्रमात विजयनं मोठी घोषणा केली आहे.



नुकताच विशाखापट्टणम येथील कार्यक्रमामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



व्हिडीओमध्ये दिसत आहे की विजय म्हणतो, 'माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी 100 कुटुंबांमध्ये एक कोटी रुपयांचे वाटप करण्याची घोषणा करत आहे. 100 कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहे.'



विजयनं ही घोषणा करताच प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात, असं व्हिडीओमध्ये दिसते.



फिल्म ट्रेड विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी विजयच्या घोषणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.



विजय हा 100 कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये येत्या दहा दिवसात देणार आहे, असं म्हटलं जात आहे.



विजयच्या खुशी या चित्रपटानं ओपनिंग-डेला जवळपास 16 कोटींची कमाई केली.



विजयनं अर्जुन रेड्डी, महानती,गीता गोविंदम या तेलुगु चित्रपटांमध्ये काम केलं आहे.



विजयच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात.