बीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' परिसंवादामध्ये गीतकार जावेद अख्तर यांनी हजेरी लावली.
लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) यांनी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांची मुलाखत घेतली.
गीतकार जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तान या देशाला भेट दिली.
पाकिस्तानमध्ये गेल्यावर कसा अनुभव आला? असा प्रश्न चेतन भगत यांनी जावेद अख्तर यांना विचारला.
प्रश्नाचं उत्तर देत जावेद अख्तर म्हणाले, 'उर्दू कवींचा तिथे मोठा महोत्सव होता. 2018 मध्ये मी पहिल्यांदा त्या महोत्सवाला हजेरी लावली. त्यानंतर यावर्षी देखील मी या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. त्या कार्यक्रमात प्रश्न-उत्तराचं सत्र सुरु होतं.'
'तेव्हा एका महिलेनं मला प्रश्न विचारला की, आम्ही तुम्हाला एवढं प्रेम करतो. पण तुम्ही समजता की प्रत्येक पाकिस्तानी हा आतंकवादी आहे. तिथे खूप कमी जागा होती. त्यामुळे मी त्या महिलेच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी खूप शांतपणे त्यांना उत्तर दिलं.' असं त्यांनी सांगितलं.
पाकिस्तानातील आर्थिक स्थितीबाबत देखील जावेद अख्तर यांनी चर्चा केली.
जावेद अख्तर यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत.
सीता और गीता, जंजीर, दीवार आणि शोले या चित्रपटातील पटकथा लेखन केलं आहे.
जावेद अख्तर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.