बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने 6 मार्च रोजी तिचा 25वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त जान्हवीने तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली होती.
यादरम्यान, जान्हवी कपूर पिवळ्या रंगाची साडी आणि गुलाबी ब्लाऊजमध्ये दिसली. ही साडी तिच्यावर खूप छान दिसत आहे.
दरम्यान, जान्हवी कपूरसोबत आणखी काही लोक या फ्रेममध्ये दिसत आहेत.
यावेळी जान्हवी कपूरने तिच्या केसांची वेणी बांधली आहे. कानात झुमके आणि गळ्यात नेकलेस घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.
हे फोटो शेअर करताना जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये 'ओम श्री वेंकटेश्वराय नमो नमः श्रीमन नारायण नमो नमः तिरुमल तिरुपती नमो नमः जय बालाजी नमो नमः' हा मंत्र लिहिला आहे.
जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यावर चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. (PC : @ janhvikapoor/IG)