न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील काल पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाना पाकिस्तानच्या महिला संघाचा पराभव केला.

भारतीय संघाने पाकिस्तान संघाचा 107 धावांनी पराभव केला.

हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचं कौतुक होतंय. मात्र एका वेगळ्या कारणासाठी टीम इंडियाच्या लेकींचं विशेष कौतुक होतंय. याचे व्हिडीओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. 



टीम इंडियाच्या खेळाडू सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बिस्माह मारुफच्या (Bismah Maroof) मुलीसोबत खेळत आहेत.  बिस्माह आपल्या मुलीला घेऊन उभी आहे. तिच्याभोवती भारतीय खेळाडूंचा गराडा आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाकिस्तानला विजयासाठी 245 धावांचे आव्हान दिले होते.



या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 137 धावांपर्यंत मजल मारता आली.

हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचं कौतुक होतंय.

मात्र एका वेगळ्या कारणासाठी टीम इंडियाच्या लेकींचं विशेष कौतुक होतंय.

याचे व्हिडीओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.