देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे देशात गेल्या 24 तासांत 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 66 जणांचा मृत्यू झाला आहे यादरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या 54,118 इतकी झाली आहे गेल्या 24 तासांत 9,620 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,23,98,095 झाली आहे कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकता दर 0.71 टक्के आहे आतापर्यंत 77.34 कोटी कोरोना चाचणी करण्यात आली आहे गेल्या 24 तासात 6,12,926 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत रविवारी दिवसभरात देशात 9 हजार 620 कोरोनातून लोक बरे झाले आतापर्यंत 4 कोटी 23 लाख 98 हजार 95 लोक संसर्गमुक्त झाले आहेत