‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री मालविका गायकवाड सध्या चर्चेत आली आहे.



‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात मालविकाने ‘चहाची टपरी’ चालवणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. ही मुलगी ‘राहुल्या’ची मैत्रीण होती.



पेशाने इंजिनिअर असणाऱ्या मालविकाने मनोरंजन विश्वात येण्याआधी एका नामांकित आयटी कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी देखील केली आहे.



परंतु, या नोकरीत तिचे मन रमले नाही. निसर्गावर प्रेम असणाऱ्या मालविकाने सर्व सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.



गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून मालविका सेंद्रिय शेती करू लागली. मात्र, यावेळी तिला सर्वांनीच वेड्यात काढलं होतं.



मात्र, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मालविकाने या कामातून स्वतःची ‘द ऑरगॅनिक कार्बन’ नावाची कंपनी देखील सुरू केली, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होत आहे.



शेतकऱ्यांना मदतीचा हात देत मालविका गायकवाडने तब्बल 18 कोटींचा हा व्यवसायाचा डोलारा उभारला आहे. अभिनेत्री नुकतीच सिद्धार्थ संघवीसोबत लग्नबंधनात अडकली आहे. (Photo : @Malvika Gaekwad/IG)