अभिनेत्री भूमी पेडणेकर बॉलिवूडच्या बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे. भूमी पेडणेकरने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर व्हाईट आणि येलो कलरच्या लेहेंगा चोलीमध्ये अतिशय स्टनिंग दिसत आहे. चोकर नेकलेस, मोकळे केस आणि मिनिमल मेकअपमुळे भूमीचा हा लूक फारच स्टायलिश दिसत आहे. भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लूकमुळे चाहत्यांची वाहवा मिळवते. सोशल मीडियावर भूमी पेडणेकरचा कधी पारंपारिक लूक, कधी ग्लॅमरस स्टाईल तर कधी बोल्ड अवतार पाहायला मिळतो. स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात वेगळी छाप पाडली आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून संघर्ष करत तिने आज हा टप्पा गाठला आहे.