बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या श्रद्धाने तिचे ट्रॅडिशनल फोटो शेअर केलेत. श्रद्धा या नवीन फोटोंमध्ये ऑरेंजल कलरच्या लेहेंगा-चोलीमध्ये दिसत आहे. पोनी हेअरस्टाईल, डायमंड चोकरन नेकलेस आणि सिंपल मेकअप केला आहे. अनेकदा चाहत्यांना तिचा नवा अवतार पाहायला मिळतो. आता श्रद्धाने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्रद्धा नेहमीप्रमाणेच खूप ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘आशिकी 2’, ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘बागी’, ‘रॉक ऑन 2’, ‘हसीना पारकर’, ‘ओके जानू’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.