बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट अन् ग्लॅमरस लूकनं अनेकांचे लक्ष वेधत असते. नुकतेच जान्हवीनं तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी, स्टोनचे इअरिंग्स अन् लाइट मेकअप अशा लूकमधील फोटो जान्हवीनं शेअर केले आहेत. फोटोमध्ये जान्हवीचे निखळ हास्य देखील दिसत आहे. जान्हवीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. जान्हवीचा काही दिवसांपूर्वी गुडलक जेरी हा ओटीटीवर चित्रपट रिलीज झाला. जान्हवीच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. जान्हवीचा 'बवाल' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'बवाल' या चित्रपटात जान्हवी आणि वरुण धवन यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. जान्हवी आणि वरुणची ऑनस्क्रीन केमिस्ट्री बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.