अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनालीनं तिच्या ट्रेडिशनल लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. ग्रीन कलरचा ड्रेस, स्टोनची रिंग अन् इअरिंग्स अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत. सोनालीनं या फोटोला 'Light is easy to love.. Isn’t it.. Here’s my dark side..' असं कॅप्शन दिलं आहे. सोनाली हृषिकेश गुप्तेच्या आगामी मराठी चित्रपट 'दिल दिमाग और बत्ती' मध्ये दिसणार आहे. सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. सोनालीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच सोनालीनं बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. अगं बाई अरेच्या २, कैरी, घराबाहेर,देऊळ,देवराई, दोघी या चित्रपटामधील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.