जान्हवी कपूर ग्लॅमरस लूक आणि फिटनेससाठी ओळखली जाते. जान्हवी कपूरने काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये जान्हवीचे सौंदर्य अधिकच खुललं आहे. तिच्या फॅन्सना हे फोटो चांगलेच आवडले आहेत. या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. जान्हवी बहुतांशी वेस्टर्न लूकमध्ये दिसते. जान्हवीने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'रुही' या चित्रपटामध्ये तिने अभिनय केला आहे.