अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकतेच जॅकलिननं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. जॅकलिनच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. एका पुरस्कार सोहळ्यासाठी जॅकलिननं हा लूक केला होता. गोल्डन शिमरी ड्रेस आणि गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो जॅकलिनं शेअर केले आहेत. फोटोमध्ये जॅकलिन ही मेकअप रुममध्ये पोज देताना दिसत आहे. जॅकलिनच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. जॅकलिनच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. जॅकलिनचा चाहता वर्ग मोठा आहे.