अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या तावडीत सापडली आहे.

ईडीने जॅकलिनची आज पुन्हा चौकशी केली आहे.

सोमवारी जॅकलीन ईडीच्या कार्यालयाबाहेर दिसली.

सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात जॅकलीनचा जबाब नोंदवण्यासाठी ती आज ईडीसमोर हजर झाली होती.

याआधीही ईडीने जॅकलिनची मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन-तीन वेळा चौकशी केली आहे.

चंद्रशेखर याच्यासोबतची कथित मैत्री समोर आल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जात आहे.

या प्रकरणी जॅकलिन आणि नोरा फतेही यांनी साक्षीदार म्हणून आपले जबाब नोंदवले आहेत.

सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप आहे.

जॅकलीनला चंद्रशेखर याने अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या.

भेटवस्तूंध्ये काही मांजरी आणि एक घोडा होता.