इस्रोच्या यशस्वी चांद्रयान-3 मोहिमेमुळे जगाला भारताचं सामर्थ्य पुन्हा एकदा दिसून आलं आहे. येत्या काळात भारत अनेक अंतराळ मोहिमा राबवणार आहे.



चांद्रयान-3 चंद्रावर उतरल्यानंतर भारत आता नव्या गगनयान अंतराळ मोहीमेसाठी सज्ज झाला आहे.



गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल.



या मोहीमे अंतर्गत मानवाला अवकाशात पाठवण्यात येणार आहे.



इस्त्रोकडून गगनयानच्या इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे.



येत्या काही महिन्यांत भारताचे सर्वात मोठे मिशन लाँच केलं जाऊ शकतं. या मानवी अंतराळ मोहिमेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



भारतीय हवाई दलातील वैमानिक अंतराळवीर म्हणून अंतराळात जातील. यासाठी त्यांचं प्रशिक्षणही सुरू आहे.



गगनयान मोहिमेसाठी आधी मानवी रोबोट अंतराळात पाठवून चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर मानवाला अंतराळात पाठवलं जाईल.



हे मिशन पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



गगनयानच्या प्रत्यक्ष उड्डाण करण्यापूर्वी तीन चाचणी मोहिमा केल्या जातील. या तीन चाचणी मोहिमा मानवरहित असतील.



गगनयान प्रकल्प हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात महागडे मिशन असेल. याचा एकूण खर्च सुमारे 10 हजार कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.