काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत.



या दौऱ्यावेळी राहुल गांधी यांनी 264 किमीचा बाईकवरुन प्रवास केला.



त्यांनी पैंगोंग त्सो लेक ते खारदुंगपर्यंत प्रवास केला.



राहुल गांधी यांनी लडाखच्या जनेतेशी संवाद साधला.



तसेच तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.



राहुल गांधी यांच्या लडाखच्या दौऱ्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत.



यावेळी राहुल गांधींनी लहान मुलांबरोबर देखील वेळ घालवला.



लडाखमधील जनतेने राहुल गांधी यांचे जल्लोषात स्वागत केले.



राहुल गांधी हे 17 आणि 18 ऑगस्ट अशा दोन दिवसांच्या लडाखच्या दौऱ्यावर गेले होते.



परंतु 18 ऑगस्ट रोजी त्यांचा लडाख दौरा हा 25 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला.