भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर लँड झालं आणि इतिहास रचला गेला आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर इस्रोला हे यश मिळालं आहे. भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम फत्ते झाली आहे. भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचलं आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा हा क्षण आणि अशी ही कौतुकास्पद इस्रोची कामगिरी आहे. चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 नं इस्रोसाठी खास मेसेज पाठवला आहे. यामध्ये लिहिलं आहे, 'मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो.' चांद्रयान-3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच जमिनीचा पहिला फोटोही इस्रोला पाठवला आहे. भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत पोहोचलं आहे. भारताने जणू चंद्रच कवेत घेतला, अशी भावना आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मातीचा अभ्यास करणार, पृथ्वी, सूर्यमाला, चंद्राच्या निर्मितीची अनेक रहस्ये शोधणार चंद्रावर सिलिकॉन लोह, टायटेनियमसारखी दुर्मीळ खनिजं शोधणार, अब्जावधी वर्ष अंधार, प्रचंड थंडीतल्या मातीत बर्फाचे रेणू शोधणार बर्फ, पाण्याचा अंश सापडल्यास भविष्यातील मोहिमांना फायदा, पाणी असल्यास चंद्रावर ऑक्सिजन, हायड्रोजनची निर्मिती शक्य ऑक्सिजन निर्मितीनंतर चंद्रावर मानवी वस्तीचं स्वप्न दृष्टिपथात