भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो शनिवार 2 सप्टेंबर रोजी मिशन आदित्यची सुरुवात करणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात येणार पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने या यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. आदित्य एल1 हे यान पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किमीचा प्रवास करणार आहे. लॅग्रेंज पाईंट 1 वर हे यान प्रस्थापित करण्यात येणार आहे. येथून सूर्याचा अभ्यास करणं या यानाला सहज शक्य होणार आहे. कोणत्याही ग्रहणकाळाचा देखील परिणाम यावर होणार नाही. त्यामुळे सूर्याचा विविध पैलूंची माहिती आता इस्रोला मिळणार आहे. भारताची ही पहिलीच सूर्य मोहीम आहे. भारताच्या या मोहीमेकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.