भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोकडून SSLV D2 रॉकेट (Small Sataellite Launch Vehicle) लाँच करण्यात आलं आहे.



इस्रोने SSLV D2 लाँच केलं आहे. या रॉकेटमधून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट (EOS 07) सह काही लहान उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडण्यात आलं आहे.



श्रीहरीकोटा येथून या उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडलं आहे. या 'बेबी रॉकेट'मधून तीन सॅटेलाईट लाँच करण्यात आले आहेत.



SSLV-D2 रॉकेटमधून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट (EOS 07), अमेरिकन कंपनी अँटरीसचा 'जानस 1' उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला.



यासोबतच देशभरातील विद्यार्थिनींनी बनवलेल्या 'आझादीसॅट 2' या लहान उपग्रहांना पृथ्वीभोवती 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत प्रक्षेपित करण्यात आला आहे.



इस्रोचं सर्वात छोटं म्हणजेच 'बेबी रॉकेट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SSLV D2 नं दुसरं उड्डाण केलं आहे. आज SSLV D2 चं दुसरं प्रायोगिक उड्डाण यशस्वीरित्या पार पडलं आहे.



आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह प्रक्षेपण पार पडलं आहे.



विशेष म्हणजे SSLV D-2 रॉकेटचं पहिलं प्रक्षेपण अयशस्वी ठरलं होतं. त्यानंतर आता या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे.



लहान उपग्रहांना कमी वेळेत आणि कमी खर्चात अवकाशात पाठवता यावे यासाठी इस्रोकडून (ISRO) एसएसएलव्ही' (SSLV) या नव्या रॉकेटची निर्मिती करण्यात आली आहे.



SSLV-D2 ने तीन उपग्रह (Satellite) घेऊन अवकाशात उड्डाण केलं. हे तीन उपग्रह पृथ्वीच्या 450 किलोमीटर अंतराच्या वर्तुळाकार कक्षेत सोडले जातील.



इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, SSLV चा वापर 500 किलो वजनाच्या उपग्रहांना खालच्या कक्षेत सोडण्यासाठी केला जातो.