काश्मीरमधील गुलमर्गच्या जगप्रसिद्ध स्की रिसॉर्टमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन आकर्षण तयार करण्यात आले आहे. भारतातील पहिलं ग्लास इग्लू रेस्टॉरंट गुलमर्ग उभारण्यात आलं आहे. हे अनोखं रेस्टारंट सध्या चर्चेचा विषय आहे. गुलमर्गमध्ये काचेचा इग्लू बांधण्यात आला आहे. हा इग्लू ओपन एअर रेस्टॉरंटचा एक भाग आहे. ग्लास इग्लू म्हणजेच काचेचा इग्लू पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. बर्फाच्छादित परिसर आणि पर्वतरांगांवरील बर्फाची चादर या निसर्ग सौंदर्याचा आनंद तुम्हाला येथे मिळेल. निसर्ग सौंदर्याचा आनंदे घेत तुम्ही येथे आरामदायी प्रकारे चविष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकतात. या अनोख्या ग्लास इग्लू रेस्टॉरंटचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक येत दाखल होत आहेत. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी सध्या गुलमर्गमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पर्यटकांना एक अनोखा अनुभव देण्यासाठी एक अप्रतिम ग्लास इग्लू रेस्टॉरंट बांधण्यात आलं आहे. गुलमर्गमधील एका खाजगी हॉटेल मालकाने हे काचेच्या इग्सूचं रेस्टॉरंट तयार केलं आहे.