पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली
भारताच्या चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी परदेश दौऱ्यावरून थेट बंगळुरूला पोहोचले आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचले.
भारताच्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेच्या यशात सहभागी महिला शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
पंतप्रधान मोदी यांनी शास्त्रज्ञांची भेट त्यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं.
यावेळी इस्रोचे सर्व शास्त्रज्ञ आणि अधिकारी पंतप्रधानाच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी इस्रोमध्ये शास्त्रज्ञांची भेट घेतल्यानंतर त्यांना संबोधितही केलं.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, चांद्रयान-3 साठी सर्व शास्त्रज्ञांनी खूप मेहनत घेतली.
इस्रोच्या चंद्रमोहिमेत महिला शास्त्रज्ञांची कामगिरीही अतुलनीय आहे.
चांद्रयान-3 च्या लँडिंगनंतरही पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला होता.
पहाटे बंगळुरु दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी आता दिल्लीला परतले आहेत.