आजारी असल्यावर डॉक्टर आपल्याला फळांचा किंवा भाज्यांचा रस सेवन करण्यास सांगतात. पण, मूत्र सेवन केल्याने अनेक आजार बरे होतात, असे दावे केले जात आहेत.
पूत्र सेवन करण्याचे फायदे आणि यूरिन थेरपी यासंदर्भात सध्या इंटरनेटवर अनेक रिपोर्टमधून वेगवेगळे दावे केले जात आहेत.
या रिपोर्टमधून दावा करण्यात आला आहे की, लघवी पिण्यामुळे अनेक आजार दूर होतात. तसेच, त्वचेसंबंधित आजारही बरे होतात.
ऑनलाईन व्हायरल होणाऱ्या रिपोर्टनुसार लघवी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
लघवीमुळे त्वचेशी संबंधित आजारांपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंतच्या आजारांपासून मुक्ती मिळते, असा दावाही केला जात आहे.
काही रिपोर्टनुसार, चीनमधील लोक स्वतःचं मूत्र पितात. यासोबतच लोक लघवीने डोळे आणि चेहराही स्वच्छ करतात. असे केल्याने चेहऱ्याची चमक आणि डोळ्यांचा क्षमता कायम राहते, असा लोकांचा विश्वास आहे.
युरिन थेरपीनुसार लघवी वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे. चीनमधील काही लोक चहाप्रमाणेच लघवी पितात आणि चेहऱ्यावरही लावतात.
डोळ्यांमध्ये ड्रॉपप्रमाणे ही मूत्राचा वापर करतात, असंही सांगितलं जातं.
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, लघवी पिण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरु आहेत.
या प्रक्रियेला यूरोफॅगिया किंवा यूरोथेरपी म्हणतात. यामध्ये मूत्राचा शरीरातील समस्या दूर करण्यासाठी वापरला जातो.
प्राचीन रोम, ग्रीस आणि इजिप्तमधील अनेक रिपोर्टनुसार, मुरुमांपासून कर्करोगापर्यंत सर्व गोष्टींवर उपचार करण्यासाठी यूरो थेरपी वापरली जात होती, असं म्हटलं जातं.
लघवी हा आपल्या शरीरातून बाहेर पडणारा कचरा असतो आणि ज्यामध्ये दूषित पदार्थ, जीवाणू असतात.
हे जीवाणू शरीरात गेल्यावर गंभीर आजारांना कारणीभूत ठरु शकतात. त्याचा तुमच्या किडनीवरही वाईट परिणाम होऊ शकतो.