ग्रुप डान्स, सोलो डान्स असे डान्सचे प्रकार आहेत. रोज 30 मिनिट डान्स करणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
डान्स केल्यानं केवळ फॅट्स कमी होत नाहीत तर मानसिक ताण देखील कमी होतो.
डान्स केल्याने शरीरातील फॅट्स कमी होतात. विविध गाण्यावर जर तुम्ही डान्स केला तर तुमच्या कॅलरी बर्न होतात. त्यामुळे वजन कमी होते.
डान्स केल्याने हार्टचं पंपिंग व्यवस्थित होते.
द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या एका रिपोर्टनुसार, डान्समुळे तुमची स्मरणशक्ती वाढते. डान्स केल्याने डिमेंशिया म्हणजे स्मृतिभ्रंश होत नाही.
नृत्यातील डान्स स्टेप्स आणि वेगवेगळ्या हालचाली लक्षात ठेवून त्या केल्याने स्मरणशक्ती सुधारते. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी डान्स रोज 30 मिनिट करावा.
नृत्यामुळे तणाव कमी होतो (stress relief) आणि हॅपी हार्मोन्स शरीरात निर्माण होतात. नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला नृत्य करण्याचा सल्ला दिला जातो.
डान्स केल्यानं शरीरात उत्साह राहतो. परीक्षा, ऑफिस यांसारख्या गोष्टींचे टेन्शन तुम्हाला येत असेल तरी देखील तुम्ही डान्स करु शकता.