इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली जीव शोधण्याचा प्रयत्न आजही एनडीआरएफचे जवान करत आहेत

एनडीआरएफच्या चार तुकड्या घटनास्थळी रवाना पोहोचल्या आहेत.

या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने आता कलम 144 लागू केलं आहे.

पोलिसांनी परिसरात बॅरिकेटिंग केली असून अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही पोलीस सोडत नाहीत

गेल्या तीन दिवसांत एकूण 27 मृतदेह सापडले असून, अद्याप 78 जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची भीती व्यक्त होत आहे.

दरड दुर्घटनेत वाचलेले 76 जण आजही घाबरलेल्या स्थितीत आहेत.

घडलेल्या प्रसंगातून ते अजून सावरलेले नाहीत. भविष्यात त्यांच्या मनावर आघात होऊ शकतो.

यासाठी मानसोपचारतज्ज्ञांमार्फत त्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

चिखल, पाऊस यामुळे शोध आणि बचावकार्यात अडचणी येत आहे. तरीही कर्मचाऱ्यांनी शोध सुरुच ठेवला आहे

Thanks for Reading. UP NEXT

भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने दगड, गोटे रस्त्यावर...

View next story