रायगडमधील चौक मानवली येथील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून 30 ते 40 घरं गाडली गेली.

आतापर्यंत 80 जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून 100 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.

रायगडमधील प्रसिद्ध ट्रेकर्स पॉईंट असलेल्या इर्शाळगडावर दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे.

रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत होत्याचं नव्हतं झालं.

अतिशय कठीण वाट पायाखाली तुडवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरड दुर्घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला.

प्रसिद्ध कलावंतीण दुर्गच्या शेजारीच असलेल्या इर्शाळगडावर दरड कोसळली.

येथे जाण्याची वाट अतिशय कठीण आहे.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दुर्घटना स्थळी स्वत: पायी जाण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ''रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील

मदतकार्याला वेग देण्यासाठी मी स्वतः घटनास्थळी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे.