रात्री 10.30 वाजता

मासेमारी करून या गावातील काही लोक घरी जात होते

रात्री 11 वाजता

डोंगराचा काही भाग खचला, काही वेळाने घरं माती खाली गेली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं

रात्री 12 वाजता

सरपंच गावकऱ्यांनी स्थानिक पोलीस आणि यांना तहसील कार्यालयाला याबाबत कळवलं

रात्री 1 वाजता

स्थानिक पोलीस व रुग्णवाहिका इतर प्रशासन कर्मचारी आमदार महेश बालदी घटनास्थळी दाखल

रात्री 2 वाजता

घटनास्थळी गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे दाखल

रात्री 3 वाजता

NDRF टीम दाखल

पहाटे 4 वाजता

स्थानिक लोक आणि उपस्थित असलेले प्रशासनाचे काही कर्मचारी लोकांना बाहेर काढत होते

पहाटे 4:30 वाजता

पनवेल, नवी मुंबई मनपाच्या रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील दाखल

पहाटे 5 वाजता

रेस्क्यू टीम वर जात असताना एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू

पहाटे 5:30 वाजता

25 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं तर चार जणांचा मृत्यू झाला होता

सकाळी 6:30 वाजता

एनडीआरएफ सहा इतर पथकांचे शोध कार्य सुरू झाले

सकाळी 7:30 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल

सकाळी 8:45 वाजता

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील घटनास्थळी दाखल

सकाळी 9.16 वाजता

80 लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश. पाच जणांचा मृत्यू.

सकाळी 10 वाजता

दुर्घटनास्थळी उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांनाही नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या

सकाळी 11 वाजता

अतिवृष्टी व पूरस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.