जगभरातील अनेक देशांमध्ये मद्यपान करणं सामान्य गोष्ट आहे.

पण, काही देश असे आहेत, जिथे दारू पिणं कायदेशीर गुन्हा आहे.

भारतातील काही राज्यांतही दारू पिण्यावर बंदी आहे.

दारूबंदी असलेल्या देशांमध्ये दारू पिणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाते.

एवढंच नाहीतर एक देश असाही आहे, जिथे दारू प्यायल्यानं थेट फासावर लटकवलं जातं.

इराणमध्ये दारूवर कठोर निर्बंध लादण्यात आलेले आहेत.

कठोर निर्बंध लादल्यानंतरही काहीजण दारू पितातच.

इराणमधील लोक दुसऱ्या देशांमधून दारू मागवतात.

इराणमध्ये मद्यपींना तुरुंगात डांबण्याचं आणि 80 चाबकाच्या फटक्यांच्या शिक्षेचं प्रावधान आहे.

इराणमध्ये मद्यपींना चार वेळा तुरुंगात डांबल्यानंतर पाचव्यांदा फासावरही दिलं जाऊ शकतं.