आपण जेव्हा परदेशात फिरायला जातो तेव्हा तिथले चविष्ट पदार्थ चाखण्याची सर्वांची इच्छा असते. अनेक जण तर खाण्याचे शौकीन सल्याने ते फक्त नव नवीन पदार्थ चाखण्यासाठी परदेशात जातात. तुम्ही ऑस्ट्रेलियाला फिरायला जाण्याचा विचार करताय? मग ऑस्ट्रेलियाला गेल्यावर हे पदार्थ नक्की चाखून पहा. बर्गर : बर्गरमध्ये फक्त टोमॅटो, कांदा, काकडी आणि मांसाचा तुकडा घालून बनवले जात नाही तर ते अनेक प्रकारे बनवले जाते. ऑस्ट्रेलियन बर्गर बनवण्यासाठी सर्वप्रथम त्यात सॅलड भाज्या, अननसाचे काही तुकडे, काही मसालेदार बीटरूट, तळलेले अंडे आणि सॉस टाकले जातात. हा बर्गर खाल्ल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही बर्गर खावासा वाटणार नाही. ग्रील्ड कांगारू : ऑस्ट्रेलियाचे लोक कांगारूचे मांस अतिशय आरोग्यदायी मानतात. तुम्हाला हे एकूण आश्चर्य वाटेल की कांगारूच्या मांसामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. ऑस्ट्रेलियात गेल्यावर हे पदार्थ चाखून पहा.