भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

सध्या सुरु असलेले IPL 2025चे सर्व उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Image Source: PTI

बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

Image Source: PTI

आयपीएलचे एकूण 16 सामने शिल्लक होते.

Image Source: PTI

हे 16 सामने आता नंतर खेळवण्यात येतील.

Image Source: PTI

मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही.

Image Source: PTI

पाकिस्तानकडून 8 तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले.

Image Source: PTI

त्यामुळे धर्मशाला इथे सुरु असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवण्यात आला होता.

Image Source: PTI

त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई, पाकिस्तानकडून होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर IPL 2025चे सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Image Source: PTI

PSL चे उर्वरित सामने दुबईत खेळवण्यात येणार आहे.

Image Source: PTI