दीपक चाहर लवकरच लग्नाच्या बंधणात अडकणार आहे दीपक चाहर आणि जया भारद्वाज एक जून रोजी लग्न करणार आहेत. दीपक चाहरच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल दीपक चाहरने आयपीएलच्या सामन्यानंतर स्टेडिअममध्येच जया भारद्वाजला प्रपोज केले होते. जया भारद्वाज दिल्लीमधील बारहखंबा येथे राहणारी आहे. बिग बॉस-5 (वर्ष-2011) मध्ये सहभाग नोंदवलेल्या अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहिण आहे. सिद्धार्थ MTV चा प्रसिद्ध शो स्पिल्ट्स विला सह इतर अनेक शोमध्ये दिसलाय. जया भारद्वाजने MBA केलेले आहे. जया एका टेलीकॉम कंपनीमध्ये डिजिटल प्लेटफार्म प्रमुख आहे. दीपक चाहर बहिण मालती चाहरमार्फत जयाला भेटला होता तेथूनच दोघांमध्ये प्रामाचे अंकूर फुटले.