अभिनेता अक्षय कुमार आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या त्यांच्या आगामी 'पृथ्वीराज' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अक्षय आणि मानुषी दोघेही रोज एकत्र स्पॉट होतात. या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते खूपच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडीओमध्ये अक्षय कुमार मानुषीचा हात धरून गुडघ्यावर बसलेला दिसत आहे. या दोघांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांना पाहून चाहत्यांना अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाची आठवण झाली आहे. व्हिडीओमध्ये खिलाडी कुमार गुडघ्यावर बसलेला दिसत आहे आणि त्याने समोर उभ्या असलेल्या मानुषीचा हात पकडला आहे.