गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात विराटनं केलेल्या तुफानी खेळीने सर्वांचीच मनं जिंकली विराटने 8 चौकार आणि 2 षटकार ठोकत 73 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खानचा याने चांगली गोलंदाजी करत दोन विकेट घेतल्या. आरसीबीकडून जोश हेजलवूडने दोन विकेट घेतल्या. तर मॅक्सवेल आणि वानंदु हसरंगा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा केल्या. हार्दिक पांड्याने नाबाद 62 धावांची खेळी केली. तर राशिद खान याने सहा चेंडूत नाबाद 19 धावा केल्या. राशिद खान आणि हार्दिक पांड्या यांनी 15 चेंडूत 36 धावांची भागिदारी करत फिनिशिंग टच दिला. पण आव्हानाचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलने सर्व सुत्रे आपल्या घेत गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. गुजरातने दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा आरसीबीने 18.4 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला