पंजाब किंग्जच्या कर्णधारपदासाठी मयंक अग्रवाल नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. पंजाबनं मेगा ऑक्शनपूर्वी मयंक अग्रवालला 12 कोटीत रिटेन केलं होतं. पंजाब किंग्जच्या कर्णधारपदासाठी मयंकसोबत शिखर धवनचेही नाव घेतलं जात होतं. के एल राहुलनं संघ सोडल्यापासून पंजाबचा संघ मयंककडं कर्णधार म्हणून पाहत असल्याचे चित्र दिसत होते. मंयकनं मागील दोन हंगामात 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मयंकनं 2011 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. मयंकनं आतापर्यंत 100 हून अधिक आयपीएलचे सामने खेळले आहेत.