Apple iphone 16 लॉन्च होण्यापूर्वीच फोनशी संबंधित अनेक गोष्टी लीक झाल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे iphone 16 ची डिझाईन लीक झाली आहे. ( Image Credit- Unsplash )



आयफोन 16 सीरिज या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, या फोनच्या लॉन्च होण्यापूर्वीच फोनशी संबंधित अनेक गोष्टी लीक झाल्या आहेत. ( Image Credit- Unsplash )



यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे iphone 16 ची डिझाईन लीक झाली आहे. यावर सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय. ( Image Credit- Unsplash )



खरंतर, आतापर्यंत फोनच्या संबंधित जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार iphone 16 चा कॅमेरा मॉड्यूल iphone 11 आणि iphone 12 सारखाच आहे. ( Image Credit- Unsplash )



कंपनी iphone 12 जसा व्हर्टिकल कॅमेरा मॉड्यूल होता तसाच कॅमेरा मॉड्यूल iphone 16 मध्येदेखील देण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त फोनचा कॅमेरा डिझाईन काहीसा iphone X सीरिजला प्रेरित होणारा आहे. ( Image Credit- Unsplash )



याचाच अर्थ असा होतो की, iphone 16 मध्ये iphone X आणि iphone 12 या दोघांच्या डिझाईनवर आधारित असेल. अर्थात आयफोन 16 चा फ्रंट लूक हा इतर आयफोनच्या तुलनेत वेगळा असणार आहे. ( Image Credit- Unsplash )



दरम्यान, सोशल मीडियावर iphone 16 शी संबंधित अनेक मीम्सही वायरल होत आहेत. यामध्ये iphone 12 चे यूजर्स iphone 13, 14 आणि 15 या आयफोनची चेष्टा करतायत. याचं कारण म्हणजे iphone 16 ची लीक झालेली कॅमेरा डिझाईन ही काहीशा फरकाने iphone 12 सारखीच आहे. ( Image Credit- Unsplash )



मिळालेल्या माहितीनुसार, iphone 16 मध्ये iphone 15 प्रमाणेच आपल्याला कटआऊट असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. iphone 16 आणि iphone 16 plus यामध्ये आपल्याला पूर्वीप्रमाणेच 6.1 इंच आणि 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ( Image Credit- Unsplash )



तर, प्रो व्हेरिएंट्समध्ये आपल्याला काही बदल पाहायला मिळू शकतात. रिपोर्ट्सनुसार, iphone 16 pro मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले आणि iphone 16 pro max मध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. ( Image Credit- Unsplash )



या प्रो सीरिजमध्ये कंपनी A18 Pro चिपसेट देण्याची शक्यता आहे. तेच, स्टॅंडर्ड म्हणजेच नॉन प्रो व्हेरिएंट्स (Pro varients) मध्ये A17 चिपसेट देण्यात आला आहे. ( Image Credit- Unsplash )



याच्या व्यतिरिक्त कंपनी 48 MP चा अल्ट्रा वाईड एॅंगल देण्याची शक्यता आहे. हा हॅंडसेट मोठी बॅटरी आणि चार्जिंग कॅपेसिटीसह लॉन्च होण्याची शक्यता आहे. ( Image Credit- Unsplash )