योगाचे फायदे जाणून घेण्यापूर्वी, योग म्हणजे नेमके काय हे समजून घेणे आवश्यक आहे. माणूस हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्राणी आहे. भारतातील आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे योगामुळे तिन्हींमधील संतुलन विकसित होण्यास मदत होते. योग म्हणजे केवळ शरीर वाकवणे आणि श्वास रोखणे नाही तर तुम्हाला वास्तवात जगण्याचा आनंद देणारा एक मार्ग आहे जर सकारात्मक ऊर्जा घेऊन तुम्ही काम केले तर अधिक आनंदी राहता. आसन ही योगाभ्यासाची फक्त एक प्राथमिक पायरी आहे. हा एक मार्ग आहे जो तुम्हाला अधिक चांगले साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करतो. योग तुमचे मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील एकरूपता आदर्श करण्यावर लक्ष केंद्रित करते. हठयोग आणि त्याच्या विविध शाखांद्वारे (अष्टांग योग, अय्यंगार योग, बिक्रम योग, यिन योग, कुंडलिनी योग) यांसारखे अनेक योगाचे प्रकार आहेत. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.